मॉस्को- आता रशियातील श्रीमंतांकडून जादा कर आकारणी करण्यात येणार आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन युद्धात होणाऱ्या खर्चासाठी निधी उभारण्यासाठी देशातील श्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या विधेयकावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे.
रशियातील २४ लाख रुबल म्हणजे २७,५०० डॉलरपर्यंतच्या उत्पन्नावर आता १३ टक्के कर द्यावा लागेल. त्याहून अधिक उत्पन्नावर ५० दशलक्ष रुबल म्हणजेच ५७३,०००
डॉलर पेक्षा जास्त उत्पन्नावर २२ टक्के कर असेल.यासंबंधीचे विधेयक दोन दिवसांपूर्वीच रशियन संसदेने मंजूर केले .संसदेचे कनिष्ठ सभागृह ‘स्टेट डय़ूमा’ आणि वरिष्ठ सभागृह ‘फेडरेशन कौन्सिल’ यांनी हे विधेयक मंजूर केले. या विधेयकात कंपन्यांसाठी प्राप्तिकर २० टक्क्यांवरून २५ टक्के करण्याची तरतूद आहे.