आता जुन्या रेल्वे डब्यांमध्ये ‘दादर दरबार’ रेस्टॉरंट सुरु

मुंबई- मध्य रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू केले होते. आता दादर रेल्वे स्थानकात देखील रेल्वेने जुन्या डब्यामध्ये ‘दादर दरबार’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. रेल्वे प्रवासी आणि इतर नागरिक देखील या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आनंद लुटू शकणार आहेत.

दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मध्य रेल्वेने हे रेस्टॉरंट सुरु केल्याने प्रवाशांसह रेल्वेचाही फायदा होणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी ७२ जण बसू शकतील. रेल्वे प्रेमींना अशा कोचमधील रेस्टॉरंटमध्ये न्याहरी किंवा जेवण करायला नक्की आवडेल असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

‘दादर दरबार’ या हॉटेलसाठी ‘मेसर्स युनिक एंटरप्रायझेस’ ला पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट दिले आहे.मध्य रेल्वेला यातून दरवर्षी १५.५९ लाख रुपये मिळणार आहेत.जुन्या रेल्वे डब्याला मुंबईतील एका प्रसिद्ध वास्तुविशारदाकडून डिझाइन केले असून त्याला रेस्टॉरंटचा लूक दिला आहे. अशाच धर्तीचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, अमरावती आणि अकोला येथे देखील कार्यरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top