मुंबई – मागील आठ दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरला.दोन्ही निर्देशांक आज वाढीसह बंद झाले.रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांसारख्या बड्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बाजारातील घसरण थांबली असे तज्ज्ञांनी सांगितले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ३०० अंकांच्या घसरणीसह (गॅप डाऊन) ७५,६४१.४१ अंकांवर उघडला.काही वेळातच तो ७५,२९४.७६ अंकांवर घसरला.मात्र दुपारनंतर तो सावरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५७.६५ अंकांनी वाढून ७५,९९६.८६ अंकांवर बंद झाला.त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी घसरणीसह २२,८०९ अंकांवर उघडाल. दिवसभरातील उलाढालींदरम्यान तो २२,७२५ अंकांपर्यंत घसरला होता. शेवटच्या तासांत त्यात सुधारणा होऊन तो ३०.२५ अंकांच्या वाढीसह २२,९५९ अंकांवर बंद झाला.
आठवड्याच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला
