सावंतवाडी – मळेवाड- कोंडूरे येथील युवा मित्र मंडळाच्यावतीने उद्या ३० ऑक्टोंबर रोजी निमंत्रित नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मळेवाड-जकातनाका येथे उद्या रात्री साडेआठ वाजता होणार आहे.
या स्पर्धेमध्ये मळेवाड कोंडूरे गावासह सातार्डा, कवठणी, आजगावं, दांडेली, न्हावेली या गावातून निमंत्रित केलेले मंडळांचे नरकासुर सहभागी होणार आहेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन युवा मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.