अयोध्येत दिवाळीत नवा विश्वविक्रम २८ लाख दीप प्रज्वलीत होणार

अयोध्या – अयोध्येत दिवाळीत नवा विश्वविक्रम होणार आहे. सुमारे ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक नरकचतुर्दशीस २८ लाख दीप प्रज्वलित करणार आहेत. अयोध्येतील ५५ घाटांवर दीप लावण्यात येणार असून दीप प्रज्वलनाबाबतच्या विक्रमाची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी त्यांच्या एका टीमलाही आमंत्रित करण्यात आले आहे.
अयोध्येतील नव्याने बांधलेले राम मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर २०२४ मध्ये पहिली दिवाळी साजरी केली जाईल. अयोध्येत दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. या दिवाळीच्या आयोजनासाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. अयोध्येतील राम मंदिरात अभिषेकनंतर या ठिकाणी तब्बल २८ लाख दिवे प्रज्वलित होणार आहेत. अशाप्रकारे २०२४ च्या दिवाळीत अयोध्येत नवा विक्रम होणार आहे. या दिवशी शरयू घाट आणि मंदिरासह अयोध्येतील इतर ठिकाणी २८ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येतील. अवध विद्यापीठाच्या सुमारे ३० हजार स्वयंसेवकांनी दीपोत्सवाच्या ठिकाणी २८ लाख दिवे लावण्याचे काम सुरू केले. आज दीप लावण्याचे काम पूर्ण होईल. हे दीप छोटी दिवाळी म्हणजे नरकचतुर्दशीस प्रज्वलित होतील.
या कार्यक्रमाचे आयोजक स्वयंसेवकांनी सांगितले की, प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा नंतर ही पहिली दिवाळी भव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. अयोध्येत प्रज्वलित होणाऱ्या दीपांसाठी ९२ हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार असून हे तेल अयोध्येत पोहोचले आहे. अयोध्येत या दीपांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहेत. घाटांव्यतिरिक्त मंदिर परिसरातही दीप लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या आत लावण्यात येणाऱ्या दीपांमुळे काजळी आणि धूर सोडणार नाहीत. यामुळे मंदिराच्या भिंती आणि दगडांवर खुणा आणि डाग पडणार नाहीत. मंदिराच्या गर्भगृहासाठी विविध प्रकारचे दीप बनवण्यात आले आहेत. काही दीप हत्तीच्या आकाराचे आहेत, जे देसी तुपाने जाळले जातील. गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरातही १ लाख दीप प्रज्वलित करण्यात येतील. मंदिरात दिव्यांशिवाय फुलांची सजावटही करण्यात आली आहे. यासोबतच मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर कमानी बांधण्यात आल्या आहे. आजपासून पुढील ४ दिवस मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top