न्युयोर्क – रविवारी अमेरिकेत आलेल्या भीषण हिमवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या १० वर्षांतील हे सर्वात भीषण बर्फाचे वादळ असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पाहता, केंटकी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, कॅन्सस, आर्कान्सा आणि मिसूरी या अमेरिकेतील ७ राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.एपी न्यूज एजन्सीनुसार, यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसचे म्हणणे आहे की या वादळाचा अमेरिकेतील ६ कोटींहून अधिक लोकांच्या जीवनावर परिणाम होईल.सामान्यतः उबदार असलेल्या फ्लोरिडामध्येही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कॅन्सस आणि मिसूरीसाठी स्पेशल अलर्ट जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय हवामान सेवेचे म्हणणे आहे की या दोन राज्यांतील अनेक भागात ८ इंचांपर्यंत बर्फवृष्टी होऊ शकते. येथे ताशी ७२ किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.अमेरिकेतील या हिमवादळामागे पोलर व्होर्टेक्स हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. ध्रुवीय भोवरे घड्याळाच्या उलट दिशेने वाहतात. जोरदार थंड वाऱ्यामुळे शिकागो ते न्यूयॉर्क आणि सेंट लुईसकडे जाणारी सर्व उड्डाणे आणि ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. केंटकी राज्यात बर्फवृष्टीचा नवा विक्रम झाला आहे. राज्यातील काही भागात १० इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. त्याचप्रमाणे लेक्सिंग्टनमध्ये ५ इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टीची नोंद झाली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |