डेनव्हर -अमेरिकेतील डेनव्हरमध्ये काल अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. डेनव्हर विमानतळावर विमान उभे असतानाच ही आग लागली. आग लागल्यावर प्रवाशांना तत्काळ आपत्कालीन दरवाजाने पंखावर उतरवून वाचवण्यात आले.
अमेरिकन एअरलाइन्सच्या या बोईंग ७३७-८०० विमानात १७२ प्रवासी होते. हे विमान कोलोरॅडो स्प्रिंग्जहून डलास-फोर्ट वर्थला गेले होते. प्रवाशांना आणि सहा क्रू मेंबर्सना गेटवरच बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. आग लवकर नियंत्रणात आणल्याबद्दल एअरलाइनने विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले.