वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अपिलीय न्यायालयाने १८ ते २० वर्षांवरील तरुणांना पिस्तूल खरेदी करण्यावर कायद्याने असलेली बंदी उठवली. न्यू ऑर्लिन्समधील युएस सर्किट कोर्ट ऑफ अपिल्सच्या तीन न्यायाधिशांच्या लवादाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.
सन २०२२ च्या आधीच्या काळात अपिलीय न्यायालयाने १८ ते २० वयोगटातील तरूणांना पिस्तूल विकण्यास बंदी घालण्याच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र सन २०२२ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निकालामध्ये १८ वर्षांवरील तरुणांचा स्वसंरक्षणाचा हक्क हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्याचे उल्लघंन करून या वयोगटातील तरुणांना पिस्तूल विक्री करण्यावर बंदी घालणे योग्य नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेत मिनेसोटा, व्हर्जिनिया आणि टेक्सास न्यायालयांनी असेच निर्णय देत १८ वर्षांवरील तरुणांना पिस्तूल विकण्यावरील बंदी उठवली होती. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील बंदी उठवण्याच्या बाजुने होते. २०२४ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी प्रचार करताना त्यांनी १८ वर्षांच्या वरील तरूणांचा पिस्तूल विकत घेण्याचा ,बाळगण्याचा अधिकार अबाधित ठेवला जाईल,अशी ग्वाही दिली होती.