वॉशिंग्टन- जागतिक ‘महासत्ता’ असलेली अमेरिका सध्या अंडी चोरणार्या चोरांमुळे बेजार झाली आहे. तुटवड्यामुळे अंडी प्रचंड महाग झाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी होत आहे.पोलिसांनी पेन्सिल्व्हेनियामध्ये हजारो डॉलरच्या किंमतीची लाखो अंडी चोरीस गेल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
चोरी झालेल्या अंड्यांची किंमत ४०,००० डॉलर म्हणजे ३४,९१,४२५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे.अमेरिकेत सध्या अंड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे देशातील अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत.अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशात अंड्याचीकिरकोळ किंमत सरासरी ७.०८ डॉलर झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही सातपट वाढ आहे. न्यूयॉर्कमध्ये अंड्याच्या कार्टनची किंमत ११.९९ डॉलरवर गेली आहे. किमती वाढल्याने अमेरिकेत अंड्याची चोरी होत आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत असे घडत आहे.पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज बघून या चोरांचा तपास करत आहेत.