प्योंगयांग – उत्तर कोरियात
अमेरिकेतील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉट डॉग खाद्यपदार्थाला गेल्या काही वर्षात खूपच पसंती मिळाली आहे. मात्र आता याच खाद्यपदार्थावर उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी अचानक बंदी घातली आहे. ‘हॉट डॉग’ बनवताना किंवा खाताना कोणी आढळले, तर त्याला शिक्षा केली जाणार आहे.
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी घेतलेल्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. ही बंदी घालण्याचे कारण अमेरिका असल्याचे सांगितले जात आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे म्हटले जात आहे.