पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवार २२ फेब्रुवारीला पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक कोरेगाव पार्क येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या भजपाला सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी शहर भाजपाच्या वतीने केली जात आहे.
अमित शहा शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार
