श्रीनगर – जम्मूत ३७४० यात्रेकरूंची नवीन तुकडी भगवती नगर यात्री निवास येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात दाखल झाली. त्यानंतर येथून वाहनांनी ही तुकडी बालटाल आणि नुनावनच्या दोन बेस कॅम्पवर पोहोचताच अमरनाथ पवित्र गुहेसाठी रवाना झाली.२९ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख ३८ हजारांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथांचे दर्शन घेतले आहे. काल १३,१३२ यात्रेकरूंनी पवित्र गुहेत बाबा अमरनाथ या दर्शन घेतले. आज सकाळी १४३५ यात्रेकरू बालटाल आणि २३०५ यात्रेकरू नुनावन येथून रवाना झाले. त्यावेळी यात्रेकरूंनी अमरनाथाबाबांचे जयघोष केला. अमरनाथ गुहा समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर उंचीवर आहे आणि ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |