मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते देव मुखर्जी यांचे आज सकाळी साडेनऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.देव मुखर्जी हे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे पिता व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका होत.’अभिनेत्री’, ‘एक बार मुस्कुरादो’, ‘आँसू बन गए फूल’, ‘किंग अंकल’, ‘कमिने’ आणि ‘मै तुलसी तेरे आँगन की’ आदि चित्रपटांमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या.गेल्या वर्षी दुर्गा पूजेच्या सोहळ्यात देव मुखर्जी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत सहभागी झाले होते. देव मुखर्जी यांनी दोन लग्न केली. पहिल्या पत्नीपासून जन्मलेली सुनिता ही मुलगी ख्यातनाम दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची पत्नी आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेले पुत्र आहेत.
अभिनेते देव मुखर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन
