नवी दिल्ली- सोन्याप्रमाणे चांदी आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री पद्धतीत आता बदल होणार आहे.सोन्याप्रमाणेच चांदीलाही हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू होणार आहे.हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना चांदीच्या शुद्धतेची हमी मिळेल.त्यामुळेच बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांच्या मागणीनुसार चांदी आणि चांदीच्या कलाकृतींसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करावे,असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. यावर पुढील सहा महिन्यांत चांदीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले जाईल,असे बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे ७८ व्या बीआयएस स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले की, चांदीच्या हॉलमार्किंगसाठी ग्राहकांकडून मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे यासंदर्भात बीआयएसने गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला पाहिजे.हा निर्णय घेतल्यास ग्राहकाला सोन्याप्रमाणे चांदीतील भेसळीपासून मुक्ती मिळेल. यावर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि बीआयएसद्वारे व्यवहार्यता मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर सरकार होईल. जेणेकरून ग्राहकांना योग्य माल मिळणे सोपे होईल.
बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, ब्युरो तीन ते सहा महिन्यांत चांदीचे ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य करू शकतो. संबंधितांशी चर्चा सुरू आहे हितधारकांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, ते त्यास अनुकूल आहेत. सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’वर चर्चा सुरू आहे.