सुरतमध्ये इमारत कोसळली मृतांची संख्या ७ वर पोहोचली

सुरत- सुरतमधील सचिन परिसरात काल दुपारी पाच मजली इमारत कोसळली. घटनास्थळावर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांचे आज दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरूच होते. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह सापडले, तर एक महिला गंभीर जखमी आहे.हिरामण केवट, अभिषेक केवट, शिवपूजन केवट, साहिल, प्रवेश, ब्रिजेश गोंड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. सातव्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. कशिश शर्मा असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरत येथील सचिन औद्योगिक परिसरात २०१७ मध्येच बांधण्यात आलेली पाच मजली इमारत कोसळली. या इमारतीतील पाच फ्लॅटमध्ये कुटुंब राहत होती. या घटनेनंतर आजही अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी ढिगारा हटवण्याचे काम सुरुच ठेवले. ढिगाऱ्याखालून एका महिलेने आवाज दिला. जवानांनी त्या महिलेस ढिगाऱ्याखालून काढले. ही महिला गंभीर जखमी असून आतापर्यंत जवानांनी ढिगाऱ्याखालून सात मृतदेह बाहेर काढले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top