नवी दिल्ली – सिरीयात सत्ताबदल होऊन विद्रोही गटाने सत्ता मिळवली असून त्यांनी देशाची पारंपांरिक चिन्हे बदलण्याला सुरुवात केली आहे. त्यानुसार आता दिल्लीतील सिरीयाच्या दूतावासावर नवा ध्वज लावण्यात आला आहे. हा ध्वज या आधी सिरीयातील विद्रोही गटाचा होता.
सिरीयाच्या दूतावासावर आता हिरवा काळा व त्यावर लाल रंगातील तीन चांदण्या असा ध्वज लावण्यात आला आहे. त्यामुळे सिरीयातील राज्यकर्त्यांनी विद्रोही गटाला राजमान्यता दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विद्रोहींचा ध्वजच आता सिरीयाचा राष्ट्रीय ध्वज झाल्याचेही निश्चित झाले आहे. बर्लिन, इस्तांबुल आणि अथेन्स सारख्या शहरांमध्येही आता सिरीयाचा हाच ध्वज फडकत आहे. सिरीयात विद्रोही गटाने बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकली आहे. त्यांनी देश सोडून रशियात शरण घेतले आहे. विद्रोही गटाने २७ नोव्हेंबरला सिरीयावर पहिल्यांदा हल्ला केला होता. त्यानंतर ११ दिवसात त्यांनी संपूर्ण सिरीयाचा ताबा घेतला आहे.