सिडकोच्या ‘माझे पसंती घर’योजनेला तिसर्‍यांदा मुदतवाढ !

*१० जानेवारीपर्यंत मिळणार
ऑनलाईन नोंदणीची संधी

नवी मुंबई- सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे १२ ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दोन वेळा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.त्यानंतर प्रतिसाद वाढल्याने तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.आता नागरिकांना येत्या १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.त्यामुळे हक्काचे आणि पसंतीचे सिडकोचे घर घेवू इच्छिणाऱ्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे.

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ यासाठीची नोंदणी १२ ऑक्टोबरला सुरूवात झाली.सुरूवातीला ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती.पण ही मुदत पहिल्यांदा वाढवण्यात आली.त्यानुसार ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार होते.मात्र अर्ज करताना येणाऱ्या अडचणी. आणि इच्छुकांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता ही मुदत पुन्हा एकदा सिकडोने वाढवली होती. त्यानुसार २६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार होते.ही दुसऱ्या वेळी दिलेली मुदत वाढ होती.ही मुदत नुकतीच संपली.त्यानंतर सिडकोने अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या तारखे नुसार आता ज्यांना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.त्यांना येत्या १० जानेवारीपर्यंत https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी ९९३०८७०००० व ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top