नाशिक: जिल्ह्यातील वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर जाणारा घाट रस्ता उद्यापासून भाविकांसाठी पूर्ववत सुरु होणार आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरी ते गड या ९ किलोमीटर लांब घाट रस्त्यावर वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या, ज्यात काही भाविकांच्या वाहनांचाही नुकसान झाला होता. यानंतर सप्तशृंगी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळी लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा केला होता. त्यानंतर शासनाने ३३ कोटींच्या निधीची मंजुरी दिली आणि २३ सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला सुरुवात केली. आता सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट मार्गावर दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, ज्यामुळे भाविकांना आता २४ तास या रस्त्यावरून सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |