शेतकऱ्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अंदमान एक्स्प्रेस रोखली

नागपूर- तामिळनाडूहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी आंदोलनाच्या ६५ कार्यकर्त्यांनी आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली होती. किसान आंदोलनाचे हे शेकडो कार्यकर्ते दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. त्यांच्या आंदोलक पवित्र्यामुळे या आंदोलकांना काल नर्मदापूर येथे रेल्वेतून उतरवले. तेथे त्यांनी जोरदार हंगामा केला त्यानंतर त्यांना दिल्लीला न जाऊ देता अंदमान एक्सप्रेसमधून तामिळनाडूला परत पाठवण्यासाठी बसवले होते. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे त्यांनी आपल्याला गाडीत जेवण न मिळाल्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नाही, म्हणून आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या इंजिनवर चढून, रूळावरलआडवे होऊन जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे ४० मिनिटे त्यांचे ‘गाडी रोको आंदोलन’ सुरू होते. गाडीला विलंब होत असल्याने गाडीतील प्रवासी संतप्त झाले होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन करून आंदोलकांशी संवाद साधून त्यांची मागणी समजून घेतली. त्यांना लगेच जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top