शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर वाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,४३६ अंकांनी वाढून ७९,९४३ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४४५ अंकांनी वाढून २४,१८८ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टी ५४४ अंकांनी वाढून ५१,६०५ अंकांवर बंद झाला.आज निफ्टीवर बँक, वित्तीय संस्था, वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तु, माहिती तंत्रज्ञान, धातू, बांधकाम उद्योग आणि औषध निर्मिती उद्योग या क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती, टायटन, एम अॅण्ड एम हे शेअर आज सर्वाधिक चढे राहिले.डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३ टक्के वाढ झाली असून जीएसटी संकलन १.७७ लाख कोटी रुपये झाले. ही वाढ आर्थिक सुधारणेचे लक्षण आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. सध्याच्या तेजीला कारणीभूत ठरलेल्या मुद्यांपैकी हा एक महत्वाचा मुद्दा ठरला आहे,असे तज्ज्ञ सांगतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top