श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा हिल्समध्ये रोपवे प्रकल्पाविरोधात व्यापार्यांनी पुकारलेला बंद आज पाचव्या दिवशीही सुरू ठेवला होता. या रोपवेमुळे ४० हजार लोकांचा रोजगार जाणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
वैष्णोदेवी श्राइन बोर्ड २५० कोटी रुपये खर्चून तारकोट मार्ग आणि कटरा येथील सांझी छटदरम्यानच्या १२ किलोमीटरच्या मार्गावर भाविकांसाठी रोपवे बांधत आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पायी किंवा खेचर वा पालखीनेच मंदिरापर्यंत पोहोचता येतो. हे स्थानिक लोकांचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे रोपवे प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. जम्मू- काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी आंदोलकांचे समर्थन करत म्हटले की,रोपवे प्रकल्पाचा निर्णय चुकीचा आहे.कटरा येथील लोकांना रोपवे प्रकल्प नको असेल तर श्राइन बोर्ड आणि नायब राज्यपाल यांनी त्यांचे म्हणणे ऐकून समस्या सोडवावी.