विलीनियस – युरोपीय देश लिथुआनियामधील एका चर्चमध्ये इतिहासाची अनेर रहस्य उलगडणारा खजिना सापडला आहे. हा खजिना पाहून संशोधकही अचंबित झाले आहे. या खजिन्याचा संबध दुसऱ्या महायुद्धाशी आहेत. या खजिन्यात ज्या वास्तू सापडल्या आहेत. यामुळे एका बड्या राजघराण्याची अनेक गुपीतं समोर येणार आहेत.
संशोधकांना सापडलेला हा खजिना दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपासून गायब होता. सीएनएननुसार, लिथुआनियामधील विल्नियस कॅथेड्रलमध्ये हा अत्यंत मौल्यवान खजिना सापडला आहे. या खजिन्यात पोलंडचा राजा आणि लिथुआनियाचा ग्रँड ड्यूक अलेक्झांडर जेगीलॉन किंवा अलेक्झांड्रोस जेगीलॉन (१४६१-१५०६) यांचा मुकुट देखील आहे. याशिवाय साखळी, पदक, अंगठी, राजदंड, आणखी एक मुकुट, ताबूत अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत.या खजिन्यामध्ये लिथुआनिया आणि पोलंडच्या राजांच्या शवपेटींना जोडलेले चिन्ह लिथुआनियन राज्यत्वाच्या दीर्घ परंपरेचे प्रतीक असल्याचे विल्नियस आर्चबिशप गिंटारस ग्रुसास यांचे म्हणणे आहे. याशिवाय यात अनेक मौल्यवान दागिनेही आहेत.या कलाकृती शाही लोकांच्या शवपेटीमध्ये त्यांच्या दफनाच्या वेळी ठेवल्या गेल्या असतील. हे त्या काळातील दफन आणि सन्मान प्रथा प्रतिबिंबित करत असल्याचे संशोधकांचा अंदाज आहे. विल्नियस चर्चच्या संचालिका रीटा पॉलीयुकेव्हिसाईट यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. खजिन्यात सापडेलली राजघराम्याशी संबधीत चिन्हे सर्वांसाठी विशेष महत्त्वाची आहेत. लिथुआनियाच्या ग्रँड डचीच्या उच्चभ्रू लोकांची स्मशानभूमी म्हणून विल्नियस कॅथेड्रलचे स्थान प्रतिबिंबित करते. युरोपियन अस्मिता ताकद दर्शवते असेही ते म्हणाले
लिथुआनिया मधील चर्चमध्ये सापडला मोठा खजिना
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/european-country-of-lithuania-1024x768.jpg)