लापता लेडीजचे पोस्टर काढून काँग्रेसची टीका

मुंबई- ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालत आहे. काँग्रेसने लापता लेडीजचे पोस्टर केले आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने राज्यातील गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. पोस्टरमध्ये ‘लापता लेडीज’ म्हणजेच हरवलेल्या ६४ हजार महिलांचे काय, असा सवाल विचारला आहे. तसेच या पोस्टरवर खाली तळाशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे दिसणाऱ्या प्रतिमा आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top