इम्फाळ- काँग्रेस खासदार आणि लोकसभा अध्यक्ष राहुल गांधी सोमवार ८ जुलै रोजी मणिपूरला जाणार आहेत. ते येथील विविध शिबिरांना आणि प्रदेश काँग्रेस कमिटी नेत्यांना भेटणार आहेत.
लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिल्यांदाच मणिपूर दौरा आहे. यावेळी ईशान्य भारतातील विविध जिल्ह्यांतील हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटणार. राहुल गांधी यांचा मणिपूरचा तिसरा आणि विरोधी पक्षनेता म्हणून पहिला दौरा असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. मेघचंद्र यांनी दिली.