नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया या कंपनीची १८ हजार कोटी रुपयात विक्री केल्यावरुन आम आदमी पार्टीने त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.आपचे नेते डॉ. रंजन यांनी एका ट्विट संदेशात चौथी पास चाय वाले का इस शतका का सौदा असे म्हणत मोदींना लक्ष्य केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी दोन सर्व सुविधा युक्त अशी दोन विमाने ८ हजार ४०० कोटी रुपयांना विकत घेतली. मात्र एअर इंडिया ही अख्खी विमान कंपनी केवळ दहा हजार कोटी अधिक म्हणजे १८ हजार कोटींना विकली. या पोस्टबरोबर त्यांनी मोदींचा विमानाच्या बरोबरचा एक फोटोही टाकला आहे. एअर इंडिया टाटा ग्रुपने विकत घेतली होती. टाटा ग्रुपने मोदींच्या पंतप्रधान फंडाला ५०० कोटी रुपयांची देणगी दिली होती.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |