मोठ्या चढ-उतारानंतरशेअर बाजारात घसरण

मुंबई – आठवड्याच्या सुरुवातीलाच आज शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६८ अंकांच्या घसरणीसह २३,६४४ अंकांवर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरून ७८,२४८ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टी ३५८ अंकांनी घसरून ५०,९५२ अंकांवर बंद झाला. आज निफ्टीमधील बँक, वित्तीय क्षेत्र, वाहन, मेटल आणि रिअल्टी निर्देशांकांतही घसरण नोंदवण्यात आली.झोमॅटो, एचसीएल टेक, इंडसइंड, सन फार्मा आदी कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर टाटा मोटर्स,टायटन, एम अँड एम, कोटक बँक,आयसीआयसीआय बँक आदिंच्या शेअरमध्ये घसरण झाली. फार्मा आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याने निफ्टीचा फार्मा निर्देशांक १.०१ टक्के वाढीसह २३,२४१ अंकांवर बंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top