*सोमवारी समिती निश्चितीसाठी सोडत
मुंबई- मुंबई शहरातील ३२ हजार फेरीवाल्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आली असून या फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी फेरीवाला समिती गठीत केली जाणार आहे. या फेरीवाला समितीत महिलांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्या समितीतील निश्चितीसाठी सोमवार २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता पालिका मुख्यालयातील समिती सभागृहात सोडत काढली जाणार आहे.
या फेरीवाला समितीत एकूण आठ प्रतिनिधी असणार आहेत.त्यामध्ये
अनुसूचित जाती एक,
अनुसूचित जमाती एक,
अल्पसंख्याक एक,इतर मागासवर्ग एक, विकलांग एक आणि खुला प्रवर्ग तीन अशी सदस्य रचना असणार आहे.यातील एक तृतियांश म्हणजे तीन पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.या सर्व प्रवर्गातून महिलांसाठीच्या ३ जागा निश्चित करण्यासाठी सोमवार २९ जुलै रोजी पालिका मुख्यालयातील समिती सभागृहात दुपारी ४ वाजता सोडत काढली जाणार आहे.ही सोडत मुंबई कामगार आयुक्तांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काढली जाईल.