मुंबई- मंत्रालय इमारतीच्या परिसरात काल एका अलिशान लॅम्बोर्गिनी गाडीने प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गाडीच्या अचानक प्रवेशामुळे चर्चांना उधाण आले होते. या आलिशान लॅम्बोर्गिनी गाडीला मंत्रालय प्रवेशद्वारातून कोणत्याही तपासणीशिवाय प्रवेश दिला होता. गाडीच्या काचा काळ्या होत्या. तर, मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा असतो त्याच ठिकाणी ही गाडी उभी केली होती. त्यामुळे गाडीत नक्की कोण होते? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
यावर संजय राऊत म्हणाले की , ते एक गूढ आहे. धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली. तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या हातामध्ये काही गोष्टी आलेल्या