भारतीय वंशाचे उद्योगपती मेहरा ठरवणार कॅनडाचे पुढील पंतप्रधान

ओटावा- कॅनडात अचानक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी लिबरल पार्टीचे नेतेपदही त्यांनी सोडले आहे. पण, नवीन सभागृह नेत्याची निवड होईपर्यंत जस्टिन ट्रुडो काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करत राहणार आहेत. लिबरल पार्टीचा नेता म्हणजे कॅनडाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी आता भारतीय वंशाचे उद्योजक आणि लिबरल परतीचे अध्यक्ष सचित मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.. लिबरल पार्टीचे अध्यक्ष असलेले मेहरा हे टुडो यांच्यानंतर पक्षातील क्रमांक २चे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील दिल्लीत राहायचे. १९६० च्या दशकात ते कॅनडाला गेले. कॅनडामध्ये विन्निपेग आणि ओटावा शहरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या रेस्टोरंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यवसायात त्यांनी जम बसवला. सचित मेहरा सध्या हाच उद्योग सांभाळतात.सचित मेहरा हे सध्या ईस्ट इंडिया कंपनीच्या रेस्टोरंट व्यवसायाचे मालक आहेत. त्याचबरोबर इतरही उद्योग ते करतात. सचित मेहरा हे कॅनडातील मॅनिटोबा येथे राहतात. ते कम्युनिटी रिलेशनचे उपाध्यक्ष आहेत. १९९४ पासून ते कौटुंबीक व्यवसाय सांभाळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top