नवी दिल्ली – भारताची आघाडीची बुद्धीबळपटू कोनेरू हम्पी हिने वर्ल्ड रॅपीड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या इरेने सुकंदार हिचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
कोनेरू हम्पी हिने याआधी सन २०१९ मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत रॅपिड चेस या प्रकारात विजेतेपद पटकावले होते. आता तिने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्याने चीनच्या जू वेनजून हिच्या पंक्तित जाऊन बसली आहे. रॅपिड चेस प्रकारात एकापेक्षा जास्त वेळा विश्वविजेतेपद मिळविणारी वेनजून ही एकमेव बुद्धीबळपटू होती. आता कोनेरू हम्पीने तिच्याशी बरोबरी साधली आहे.