नवी दिल्ली – देशातील सर्व बँक कर्मचारी येत्या २४ व २५ मार्च रोजी संपावर जाणार आहेत. त्यामुळे हे दोन दिवस देशभरातील सर्व बँका बंद राहण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या मध्यवर्ती संघटनेने ही घोषणा केली.बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत काल भारतीय बँक संघ आयबीए (इंडियन बँक असोसिएशन) बरोबरची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बँकांत सर्वच स्तरावर भरती करण्याची त्याचप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. या आधी बँकेच्या नऊ कर्मचारी युनियनच्या फेडरेशननेही संपाची घोषणा केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप
