फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुखकर्तव्य पथावर करणार हवाई पुष्पवृष्टी

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या वेळेस विमानातून ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यंदा ही पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी राज्यातील बीडची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख पार पाडणार आहे. राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात त्या भारतीय वायुदलाच्या परेड कमांडर ची जबाबदारी सांभाळणार आहे.दामिनी दिलीप देशमुख ही वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून ती बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची आहेत. दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त कमिशनर होते. दामिनीने २०१९ मध्ये मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहण, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे. त्या मुळेच तिच्यावर भारतीय ध्वजाला विमानातून मानवंदना व पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top