नवी दिल्ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ ने मोबाईल कंपन्यांच्या टॅरिफ नियमांमध्ये सुधारणा केली आहे.आता ग्राहकांच्या फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र व्हाऊचर उपलब्ध करणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. जे मोबाईल ग्राहक इंटरनेट सेवा वापरत नाहीत, त्यांच्यासाठी हा निर्णय
‘ट्राय ‘ ने घेतला आहे.
‘ट्राय ‘ ने म्हटले आहे की,जे मोबाईल ग्राहक केवळ बोलण्यासाठी आणि एसएमएस पाठविण्यासाठी मोबाईलचा वापर करतात ते इंटरनेट सेवा वापरत नाहीत.अशा ग्राहकांसाठी विशेष रिचार्ज व्हाऊचर तयार करावेत.अनेक घरांमध्ये ब्रॉडबँड असून त्यांना त्यांच्या मोबाईल रिचार्जची गरज नसते. तसेच आता विशेष रिचार्ज कूपनवरील ९० दिवसांची कूपन मर्यादा हटवून ती आता ३६५ दिवसांपर्यंत करण्यात आहे.तसेच ‘ट्राय’ने दूरसंचार कंपन्यांना कोणत्याही मूल्याचे रिचार्ज व्हाउचर जारी करण्याची परवानगी दिली आहे, परंतु त्यांनी किमान १० रुपयांचे रिचार्ज कूपन देखील ग्राहकांसाठी उपलब्ध केले पाहिजे.