अयोध्या – अयोध्येच्या राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन पुढील वर्षी ११ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असे संबोधले जाणार आहे.या निमित्ताने ११ ते १३ जानेवारी असे तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या सोहळ्याची तपशिलवार माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार ११ जानेवारी रोजी यज्ञ मंडप येथे सकाळी आणि दुपारी शुक्ल यजुर्वेद मंत्रोच्चारात अग्निहोत्र, सहा लाख रामनाम जप, रामरक्षा स्त्रोत्र, हनुमान चालिसा आदिंचे पठण होईल. तर मंदिराच्या तळघरात राग सेवा, बधाई गान, भाविक सुविधा केंद्रााच्या पहिल्या मजल्यावर संगीतमय मानस पाठ, अंगद टिला येथे रामकथा, मानस प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पहाटेपासून प्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |