पोरबंदर- पोरबंदरमध्ये आज दुपारी भारतीय तटरक्षक दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकासह एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्हमध्ये घडली. या हेलिकॉप्टरचे उड्डाणाचे प्रशिक्षण सुरु असताना हा बिघाड झाला. त्यानंतर गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दलाच्या विमानतळावर उतरताना हेलिकॉप्टरला अपघात झाला.यावेळी एका व्यक्तीने हेलिकॉप्टरमधून उडी मारली, तर अन्य दोघेजण जखमी झाले होते. परंतु तिघा जखमींचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली. विमानात दोन वैमानिक आणि अन्य तीन जण होते. विमान दुर्घटनेबाबत भारतीय तटरक्षक दलाकडून तपास करण्यात येत आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |