चंडीगड – पंजाबच्या मोगा येथे शिंदे गटाचे नेते मंगत राम यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली.
स्टेडियम रोड वीरवार परिसरातून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगत राम काल घरी दूध घेऊन जात होते. तेव्हा ३ अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले.स्थानिकांनी त्यांना मोगा सिव्हील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गोळीबारात १२ वर्षीय थॉमस नावाचा मुलगा देखील जखमी झाला.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंजाबमध्ये शिंदे गटाच्या नेत्याची अज्ञाताकडून हत्या
