नागपुरात मामाने दोन भाच्यांची हत्या केली

नागपूर – नागपुरातील कालीमाता मंदिरासमोर गांधीबाग येथे पैशाच्या वादातून मामानेच भररस्त्यावर आपल्या दोन्ही भाच्यांचा चाकूने हल्ला केला.या हल्ल्यात एका भाच्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला.

रवी राठोड आणि दीपक राठोड असे मृत्यू झालेल्या भाच्यांची नावे आहेत. बदनसिंग राठोड असे आरोपी मामाचे नाव आहे.रवी आणि दीपक राठोड हे सख्खे भाऊ होते. दोघेही हंसापुरी भागात राहत होते.त्यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय होता.मागील काही दिवसांपासून त्यांचा आपला मामा बदनसिंग सोबत पैशाच्या व्यवहारातून वाद सुरू होता. पैसे देत नसल्यामुळे मामाला राग आला होता. मध्यरात्री १२ वाजता मामाने आपला गांधीबागमध्ये रवीवर चाकूने हल्ला केला.त्यात रवीचा मृत्यू झाला. मामाचा अवतार बघून आपल्या भावाला वाचविण्यासाठी दीपकने धाव घेतली. मामाने त्याच्यावरही चाकूहल्ला केला.दीपकला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र दीपकचाही पहाटे चार वाजता मृत्यू झाला. दीपक आणि रवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.या घटनेमुळे गांधीबाग परिसरात खळबळ उडाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top