नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्या पहिले विमान उतरणार आहे. इंडिगो कंपनीचे ए-३२० हे विमान या विमानतळावर उतरणारे पहिले विमान ठरणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी भारतीय विमान उड्डाण प्राधिकरणाने या विमानतळावर विमान उड्डाण आणि विमान उतरण्याशी संबंधित अत्यंत महत्वाची प्रिसिजन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पीएपीआय) ही चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ३१ मार्च २०२५ पासून या विमानतळाचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात येणार आहे.
नवी मुंबई विमानतळावर आज पहिले विमान उतरणार
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/navi-mumbai-airport-iaf-inaugurates-runway-will-start-operation-from-2025-1024x576.jpg)