नवी मुंबई – आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती तिरुमला देवस्थानमच्या वतीने नवी मुंबईतील उलवे येथे उभारण्यात येणार असलेल्या व्यंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिराला स्थानिक मच्छिमार आणि पर्यावरणवादी तीव्र विरोध करीत आहेत. नॅटकनेक्ट फाउंडेशन या पर्यावरणवादी स्वयंसेवी संघटनेने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना पत्र लिहिले असून या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची आग्रही मागणी केली आहे.उलवेमध्ये ज्या ठिकाणी हे मंदिर प्रस्तावित आहे तो भूभाग पूररेषेलगत आहे. सीडकोने मंदिर उभारण्यासाठी ४० हजार चौरस मीटरचा भूखंड तिरुपती तिरुमला देवस्थानमला दिला आहे. ही जागा दलदलीची असून पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. या दलदलीच्या क्षेत्रात तिवरांची जंगले असून सागरी परिसंस्थेच्या रक्षणासाठी ही जंगले अत्यंत आवश्य़क आहेत.त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भूखंडावर मंदिराची उभारणी करू नये,असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने पत्रात म्हटले आहे.यासंदर्भात बोलताना नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले की तिरुपती तिरुमला देवस्थानमने नवी मुंबईमध्ये मंदिर बांधण्यास आमची काहीच हरकत नाही. सध्या जागतिक हावामान बदलामुळे समुद्रांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. याचा विचार करून पूररेषेलगत असलेल्या या भूखंडावर कोणतेही बांधकाम होऊ नये ही आमची भूमिका आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |