मुंबई- नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर १४ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, तेल कंपन्यांनी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही . मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपये केली आहे, जी याआधी १,७७१ रुपये होती. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना फायदा होणार आहे.
साधारण सहा महिन्यांनंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. याआधी गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ केली होती. या काळात मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात एकूण १६.५० रुपयांची वाढ झाली होती.