नववर्ष स्वागताच्या रात्री मुंबईत रेल्वेच्या जादा लोकल

मुंबई – नववर्ष स्वागतासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने अतिरिक्त लोकलगाडयांचे नियोजन केले आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबईत चालणार १२ अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारी पहाटेपर्यंत या अतिरिक्त लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर ८ अतिरिक्त लोकल चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत. तर मध्य रेल्वे ४ अतिरिक्त लोकल चालवणार आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण आणि पनवेल अशा या स्पेशल ट्रेन आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top