नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी

मुंबई – नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचे भाव ३७२ रुपयांनी वाढून ७६,५३४ रुपये प्रतितोळा झाला.दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र ११७ रुपयांची घसरण झाली.आज चांदीचा भाव ८५,९०० रुपये प्रतिकिलोवर खुला झाला.२३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ३७१ रुपयांनी वाढून ७६,२२८ रुपये , २२ कॅरेटचा भाव ३४१ रुपयांनी वाढून ७०,१०५ रुपये , १८ कॅरेटचा भाव २७९ रुपयांनी वाढून ५७,४०१ आणि १४ कॅरेटचा भाव २१७ रुपयांनी वाढून ४४,७७२ रुपये झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top