मुंबई- अरबी समुद्रात पुन्हा आर्द्रता वाढली असून मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राज्यात तापमानात पुन्हा वाढ झाली असून गारठा वाढला आहे.गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १-३ अंशांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान,येत्या दोन दिवसात राज्यातील थंडी आणखी वाढणार असून किमान तापमान ३-५ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान भागात सक्रीय आहे.त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्षवृष्टी होण्याची शक्यता आहे.चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर आहे.अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहेत.राज्यात बहुतांश भागात येत्या २-३ दिवसात तापमान घसरणार असून ३- ५ अंशांनी राज्यात किमान तापमानात घट होणार आहे. सोमवारी राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली.कमाल तापमानही वाढले होते.आता येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार आहे.