नवी दिल्ली – चलो दिल्लीच नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या उत्तर प्रदेशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. या शेतकर्यांना काल दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी थांबवण्यात आले होते. आज दुपारी त्यांना अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकी कोंडी होऊ नये म्हणून कालपासून या शेतकऱ्यांना दलित प्रेरणास्थळ येथे रोखण्यात आले होते. आज दुपारी पोलिसांनी पाऊणतास वाहतूक बंद केली होती. या शेतकऱ्यांना अटक करण्याची कारवाई केली. त्यानंतर या शेतकऱ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या दहा बसमध्ये बसवून तुरुंगात पाठवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची पोलिसांबरोबर झटापटही झाली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांचे अडथळे मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. संयुक्त किसान मोर्चाने ६ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला आहे.