नवी दिल्ली – दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या नव्या सरकारने १५ वर्षे जुन्या वाहनांना ३१ मार्च नंतर पेट्रोल वा डिझेल न देण्याचा निर्णय दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी जाहीर केला.राजधानीतील प्रदूषणाने मोठा गहजब उडवून दिला होता. दिल्लीतील हवेची गुणवत्ता हा गेल्या काही वर्षांमधील कळीचा मुद्दा असून त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १५ वर्षे जुन्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दिल्लीत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी व मोठ्या कार्यालयांमध्ये एँटी स्मोक गन बसवणेही बंधनकारक करण्य़ात आले आहे. दिल्लीत गंभीर प्रदूषण निर्माण झाल्यास कृत्रिम पाऊस पाडला जाईल असेही प्रदूषण मंत्र्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत १५ वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल नाही
