टोरांटो – कॅनडाची राजधानी टोरांटो येथील टोरांटो पियरसन विमानतळावर काल झालेल्या विमान अपघातात १७ जण जखमी झाले. विमान धावपट्टीवर उतरल्यावर बर्फाळ धावपट्टीवर घसरुन ते चक्क उलटे झाले. या अपघातानंतर टोरांटो विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद करण्यात आल्या. यातील प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढण्यात आले असून त्यातील जखमी झालेल्या १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.डेल्टा एअरलाईन्सचे हे विमान सीआरजे – ९०० हे काल दुपारी सव्वादोन वाजता विमानतळावर उतरले. यावेळी विमानतळ परिसर व धावपट्टीही बर्फाने झाकली गेली होती. त्यामुळे धावपट्टीही निसरडी झाली होती. त्यावरुन घसरल्याने हे विमान नियंत्रणाबाहेर जाऊन चक्क उलटे झाले. विमानात एकूण ७६ प्रवासी होते. त्यातील १७ जखमी झाले असून या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर दोन्ही धावपट्ट्या बंद करण्यात आल्या. त्या नंतर रात्री उशीरा पुन्हा सुरु करण्यात आल्या.
टोरांटोत विमान उलटले सतरा प्रवासी जखमी
