पुणे – राज्यात जीबीएस रुग्णसंख्येने १४९ चा आकडा पार केला आहे. तर या आजाराने आतापर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसचा प्रसार आरोग्य यंत्रणा सतर्क असूनसुद्धा थांबत नाही. या आजाराच्या रुग्णसंख्येत रोज वाढ होत आहे. केवळ रुग्णसंख्याच वाढत नाही, तर व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. काल पुण्यात तीन नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या १४९ वर पोहोचली.तर व्हेंटिलेटवर २८ रुग्ण आहेत. मृतांची आकडा ५ झाला आहे.
जीबीएस रुग्णसंख्या १४९ आतापर्यंत ५ मृत्यू !
