पुणे – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यासंदर्भात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे कुटुंबातील भावी वधुवराला शुभेच्छा दिल्या. राजकीय क्षेत्रापासून अलिप्त असलेल्या आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या जय पवार यांचे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्न ठरले आहे. जय व ऋतुजा अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ते दोघेही आता लग्नबंधनात अडकणार आहेत. पवार घराण्याच्या सूनबाई होणाऱ्या ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटीलकुटुंबाची सून आहे. १० एप्रिलला जय व ऋतुजा यांचा साखरपुडा होणार असून डिसेंबरमध्ये विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.
जय पवार लग्नबेडीत अडकणार! खा. सुप्रिया सुळेंच्या शुभेच्छा
