फ्लोरिडा – फायरफ्लाय एरोस्पेस या अमेरिकेच्या खासगी कंपनीचे ब्लू घोस्ट लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरले. हे लँडिंग चंद्राच्या मारे क्रिसियम भागात झाले असून चंद्रावर उतरलेले हे दुसरे खासगी यान आहे.उद्योगपती इलॅान मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन ९या रॉकेटद्वारे १५जानेवारी २०२५ रोजी ब्लू घोस्ट अवकाशात पाठवण्यात आले. चंद्रावर उतरल्यानंतर लगेचच ब्लू घोस्टने चंद्रावरून फोटो पाठवायला सुरुवात केली असून कंपनीने हे फोटो त्यांच्या एक्सवर पोस्ट केले. या मोहिमेचा उद्देश पृथ्वीवरून चंद्रावर दिसणाऱ्या ‘सी ऑफ क्रायसिस’या विशाल विवराचा शोध घेणे आहे. अमेरिकेतील काजव्याच्या एका दुर्मिळ प्रजातीच्या नावावरून ब्लू घोस्ट हे नाव देण्यात आले. ४ पायांचे लँडर ६फूट ६इंच (२ मीटर)लांब आणि ११ फूट (३.५ मीटर)रुंद आहे.
खासगी ब्लू घोस्ट लँडर चंद्रावर सुरक्षित उतरले
