शिवपुरी – महाकुंभ मेळ्यावरून परताना आज कानपूर- लखनौ महामार्गावर जीप आणि बसचा अपघात झाला. यात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जीपमध्ये अडकेलल्या भाविकांना बाहेर काढले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
मध्य प्रदेशमधील ईशागड आणि शिवपूरी येथील १२ भाविक कुंभमेळ्यावरून घराकडे परत निघाले होते. बसमध्ये बिघाड झाल्यामुळे महोबा डेपोची बस अजगैन परिसरात रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी जीपने या बसला घडक दिली. यात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी बाप-लेकीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघाताचा पोलीस तपास करत आहेत.
कुंभमेळ्याहून परतताना अपघात बाप-लेकीचा मृत्यू, १० जण गंभीर
